तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  शेवगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवजच्या आधारे आभासी वाळू लिलावचा कट रचला.

याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विशाल बलदवा याने आमरण सुरु केले आहे. यावेळी उपोषणकर्ते बलदवा यांनी म्हंटले कि, वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही सर्व पुरावे देऊन देखील जिल्हा प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत आहे व सामान्य

व्यक्तींवर कठोर कारवाई करत तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. यासंदर्भात वाळू लिलावाच्या नकला मागितले असता तालुक्यातील झेरॉक्स मशीन बंद आहे.

म्हणून मौजे पिंगेवाडी वाळू लिलावाच्या नकला मला देत येणार नाही. १५ तारखेनंतर देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. उपोषण कर्त्यांचे गंभीर आरोप…. तहसीलदारांनी बेकायदेशीरपणे २४ ब्रास चे चलन काढून जणू लाखभर रुपयांचा तुकडा शासनाच्या तोंडात घालून केलेला

अति गंभीर गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला आणि पिंगेवाडी येथील मोठ्या प्रमाणात असलेल्या वाळू साठ्याचे फक्त २४ ब्रास वाळू दाखवून लिलाव झालेला नसताना फक्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासह शासनाचे अन्न खाता

महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडवत खोटे दस्तऐवज तयार करत अति गंभीर गुन्हा केला आहे. दरम्यान यासर्व गोष्टींचा विचार करून तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करत

शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe