अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-कोरोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे काढे, अँटीबायोटिक्स आणि व्हिटामिनच्या गोळ्यांमुळे आता मुळव्याधीची समस्या जाणवू लागलीये.
अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतायत. द्रवणशिल नसलेल्या गोळ्या घेतल्यानं मूळव्याधचा त्रास उद्भवतोय. तर आयुर्वेदिक काढे हे शरिरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे हायपर अॅसिडिटी, जळजळ, आतड्यांमध्ये वेदना होतात.
तसंच गरम काढे प्यायल्यानं अतिसार किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेही मूळव्याधीची शक्यता वाढते. द्रवणशिल नसलेल्या व्हिटॅमिन गोळ्यांमुळे फिशर किंवा मूळव्याधीचा त्रास उद्भवतो असं मुळव्याध सर्जन डॉ. संदीप अगरवाल यांनी म्हटलंय.
कोरोना काळात ही औषधे अती प्रमाणात घेतली गेली. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच व्हिटॅमिन युक्त औषधांचे सेवन करावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. अयोग्य जीवनशैली आणि अवेळी खाणे याने अनेक समस्यांचा सामना लोकांना करावा लागतो.
मूळव्याध हीदेखील अशीच एक गंभीर समस्या आहे. मूळव्याध म्हणजे शौचास होताना वेदना होणे आणि खाज येणे. मूळव्याध दोन प्रकारचे असतात, एक रक्तस्त्राव होणारा आणि दुसरा चट्टे असणारा.
मूळव्याध असलेल्यांनी हे खाणं टाळावं मूळव्याध असणाऱ्यांनी हिरवी आणि लाल मिरची खाण्याचा मोह टाळायला हवा. अनेकांना मिरची आणि चटपटीत मसालेदार खाणे आवडते पण त्याने त्यांची समस्या अधिक वाढू शकते.
म्हणून आपल्या आरोग्यासाठी त्यांनी मिरची आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये. कुठल्याही प्रकारचं व्यसन मूळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी घातक आहे. सुपारी, पान मसाला, गुटखा यांचे सेवन करू नये. याचं व्यसन लागतं.
अनेकदा आपण पाहतो की लोकांना असे पदार्थ खाल्ल्याशिवाय शौचास होत नाही. पण त्यामुळे मूळव्याध वाढू शकतो मूळव्याध असलेल्यांनी हे जरूर खावे मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात त्यात भरपूर प्रमाणात अनेक अँटी ऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात.
पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगले होते. या लोकांनी पालक, कोबी, फूलकोबी, काकडी, गाजर, कांदा खायला हवा. त्याचप्रमाणे या लोकांनी दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यायला हवे. कारण पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये लघवीवाटे बाहेर निघून जातात, बद्धकोष्ठता ठिक होते आणि शौचास त्रास कमी होतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम