महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला लोकाभिमुखता व गतिमान करत संगणकीकृत केले.

ऑनलाइन सातबारा ही संकल्पना राबवल्यामुळे मंगळवारी राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० नागरिकांनी सातबारा उतारे डाऊनलोड केल्याने मोठा विक्रम महसूलच्या नावावर नोंदला गेला.

मंत्री थोरातांनी महसूल विभागाला लोकाभिमुख व गतिमान करत हायटेक केले. विद्यार्थ्यांना शाळेत ८० लाख दाखले देण्याचा कामगिरीमुळे महसूलची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

सर्व सामान्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन सातबारा, ई-फेरफार, ई-मोजणी असे उपक्रम राबवले. ७२ हजार ७०० सातबारा डाऊनलोड झाल्याने सरकारला २३ लाखांचा महसूल एका दिवसात प्राप्त झाला.

शेतकऱ्यांना सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या महाभूमी संकेतस्थळावरून उच्चांकी सेवा देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe