मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलचे दर कमी …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ शकतात.

इक्रा या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु शकते. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात विशेष घट होणार नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे सरकारच्या ही तूट भविष्यात भरून निघेल.त्यामुळे मोदी सरकारकडून लवकरच इंधनावरील करात कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

दरम्यान केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे.

चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल.

2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe