अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून लागू होणार आहेत हे निर्बंध !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.

नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या तिसर्‍या लेवलमध्ये आहे. त्यानुसार या लेवलचे निर्बंध उद्यापासून (रविवार) जिल्ह्यात लागू होणार आहेत.

यात शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळात सर्व बंद (विकेंड लॉकडाउन) राहणार असून, अन्य दिवशी दुपारी चारपर्यंतच सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज सकाळी सर्व तहसीलदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

यात नगर जिल्हा कोविड निर्बंधांच्या लेवल-3 मध्ये असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरकारच्या सुचनेनूसार उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

यात सर्व तालुक्यातील सर्व दुकाने/आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच दर शनिवारी/रविवारी फक्त मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील (किराणा दुकाने सुद्धा बंद राहतील). याबाबतचे सविस्तर आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News