अहमदनगर :- मनमाड रस्त्यावरील देहरे शिवारातील टोलनाक्याच्या केबिनमध्ये लावलेले तीन संगणक संच व सीपी प्लस कंपनीचे दोन कॅमेरे चोरट्यांनी लांबवले. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. टोलनाक्याच्या केबिनमध्ये असूस कंपनीचे तीन संगणक संच व सीपी प्लस कंपनीचे कॅमेरे बसवलेले होते.
हा टोलनाका सध्या बंद आहे. त्या बंद टोलनाक्याच्या केबिनच्या दरवाजाचे कुलूप चोरांनी तोडून आत प्रवेश केला. आतील ६० हजार रुपये किमतीचे संगणक संच व चार हजार रुपये किमतीचे दोन कॅमेरे चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे