अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्यात उत्पादित होणारा कांदा स्थानिक पातळीवर अनेक व्यापारी खरेदी करून तोच कांदा इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विकतात. या दरम्यान अनेकदा कांदा विकल्यानंतर त्याचे पैसे दिले जातात.
मात्र कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील स्थानिक कांदा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे १६ लाख ६१ हजार ६५० रूपये न दिल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी तामीळनाडू राज्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, ब्राम्हणगाव येथील कांदा व्यापारी कैलास भिमराज माकुणे यांच्याकडून कोकमठाण येथील पुणतांबा फाटा येथून सारवनन चेट्टीयार (रा. गोपालपुरम, ता. पोलाची जि. कोईमतूर, राज्य तामीळनाडू)
याने १३ मे २०२१ पासून ते आजपर्यंत १६ लाख ६१ हजार ६५० रुपये कांदा घेऊन कांद्याचे पेसे न देता विश्वासघात करुन फसवणूक केली आहे.
म्हणून माकोणे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सारवनन चेट्टीयार याच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम