महिलांची खिल्ली उडवणे, नगराध्यक्ष वहाडणे हा तर तुमचा पिंडच !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोपरगाव शहर | एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम

माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्याबद्दल व महिलांबद्दल तिरस्कराची भाषा वापरून खिल्ली उडवली होती.

या गोष्टीवरून भाजपच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारून त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता.

वरील गोष्ट घडल्यानंतर परत एकदा माजी महिला आमदारांबद्दल गरळ ओकली. त्यांनी कोणताही निधी कोपरगाव नगपरिषदेला मिळवून दिला नाही, असे जनतेला खोटे सांगितले.

यावरून वहाडणे यांची महिलांविषयीची द्वेश भावना दिसून येते, अशी टीका स्वप्नील निखाडे यांनी केली.

स्वत:च्या व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी धडधडीत खोटे बोलणे ही तुमची प्रवृत्ती झाली. महिलांबद्दलचे आपले विचार काय आहे

हे कोपरगाव शहरातील जनतेला चांगलेच माहित आहे. नगराध्यक्ष महोदय, तुमचे महिलाबद्दलचे विचार यापूर्वीच कोपरगावकरांच्या लक्षात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News