विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगाव शहरातील २८ विविध विकास कामांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशाला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्वतःचे व कोल्हे गटाचे हसे करून घेतले आहे.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनीही कोल्हे गटाला फैलावर घेतले आहे. विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.जेष्ठ नेते काळे-कोल्हे या नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण केले नाही.

मात्र दुसरी पिढी मात्र घसरली आहे.त्यामुळे राजकीय नुकसानी बरोबर शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह अठ्ठावीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.

त्या बाबत सुनावणी पूर्ण झाली होती त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२३ मार्च रोजी जाहीर केला होता. मात्र अस्वस्थ कोल्हे गटाच्या हा विषय पचनी पडला नाही व

त्यांनी या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निकालाला दि.२५ जून रोजी आव्हान दिले आहे. “कोल्हे गटाने विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर खंडपीठात जाणे म्हणजे विकासकांमाचा बळी मानला जात आहे.

तुमचा विरोध राजकारणाच्या मर्यादित ठेवा त्याचे नख विकासकामा लागू देऊ नका.आजपर्यंत कोपरगावच्या विकासाच्या इतिहासात अशी नोंद झालेली नाही तो विक्रम आता कोल्हे गटाच्या नावावर नोंदवला जाईल.

हि विकास कामे काही कोणाच्या खाजगी मालमत्तेतून होणार नव्हती अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe