मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी महाविकास आघाडी सरकारने माफ करावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी माफ करावी आशी मागणी भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत सविस्तर पत्र दिले असून आरक्षणाच्या कारणाने चिंताग्रस्त बनलेल्या विद्यार्थ्याना आणि नोकर्यांची नियुक्ती पत्र न मिळालेल्या

उमेदवारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने फी माफ करण्याचा निर्णय तातडीने करण्याची विनंती केली आहे. सर्वौच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर दोन्ही समाजांना दिलासा देणारे निर्णय सरकारने घ्यायला

हवे होते परंतू सरकारकडून तसे काही होताना दिसत नाही.सरकारकडून फक्त वेळकाढूपणाचे धोरण सुरू असल्याने आता नोकरीस पात्र असणारे उमेदवार आत्महत्या करू लागले असल्याची बाब आ.विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षांची फी माफ करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा सर्व विद्यार्थी महाविद्यालयांमोर जावून आंदोलन करतील असा इशाराही आ.विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe