अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. 67 वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली.
घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने धोब्याने माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वसंत विहार भागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. घटनेच्या वेळी किटी कुमारमंगललमआणि त्यांची मोलकरीण या दोघीच घरात होत्या.
दरवाजाची बेल वाजवून धोबी घरात आला. त्याच्या पाठोपाठ आणखी दोघे जण घरात शिरले. त्यानंतर आरोपींनी मोलकरणीला एका खोलीत बंद केलं. दरोडा टाकल्यानंतर किटी कुमारमंगललम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली.
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मोलकरणीने त्यांच्या धोब्याची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम