निष्क्रिय प्रशासनामुळे पुणतांबा बनू लागला अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यात दिवसेंदिवस अवॊधी धंदे फोफावू लागले आहे. यातच अशा अवैध धंदे चालकांवर कारवाईचे प्रमाण कमी असल्याने याचा सर्व त्रास आता नागरिकांना सहन करावा लागतो आहे.

यातच जिल्ह्यातील पुणतांबा मध्ये सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु असलेला दिसून येऊ लागला आहे. यामुळे गावातील शांतता भंग झाली आहे. अवैध धंद्यानी गावात व परिसरात चांगलाच जम बसविल्यामुळे गावात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असल्यामुळे ग्रामस्थामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्षतेमुळे गावातील कायदा व सुवसिवस्था धोक्यात येऊ लागला आहे. यातच सध्या येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा होत आहे. या व्यवसायात पुणतांब्यातील अनेक जण उतरले आहेत.

बेकायदा वाळू उपशा बरोबर गावात मटका, जुगार अड्डे, हातभट्टीच्या तसेच बेकायदा विदेशी दारूची विक्री सारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे.

अवैध धंदे चालकाकडून ग्रामस्थांना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहे. एकीकडे हे सगळे अवैध धंदे सुरु असताना पोलीस यंत्रणा कारवाई करत नाही. तसेच बहुतांशी अवैध धंदे चालकांचे राजकीय नेत्यांशी लागबांधे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

तसेच पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जाते. ग्रामपंचायत प्रशासनही बघ्याची भूमिका घेते.

असेच सुरु राहिले ते गावातील नागरिकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. गावातील सर्वच प्रकारचे अवैध धंदे तातडीने बंद करण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News