अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- बेशिस्त वाहनचालक नियमांचा भंग करत असतात. त्यांच्यावर वचक राहावी व नियमांचा भंग होऊ नये यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असते.
यातच महामार्ग पोलिसांकडून गेल्या ६ महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३२९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत या वाहन चालकांना तब्बल ४ कोटी ८३ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे.

मात्र यातील विषेशबाबा म्हणजे दंडाच्या रक्कमेपैकी अवघ्या ७ हजार ३६२ जणांनी ४० लाख ७१ हजार १०० जणांनी दंड भरला आहे. ८१ हजार ९६७ जणांकडे ४ कोटी ४३ लाख ८४ हजार रुपये बाकी आहेत.
यामुळे आकडेवारीतून असे दिसून येत आहे कि, कारवाई झाली मात्र हा दंड वसूल कधी केला जाणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना २०२० पासून स्पिडगणच्या माध्यमातून ऑनलाइन दंड केला जातो. विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाइलवर बोलणे, नो पार्किंग, ट्रिपल सीट, विनालायसन्स आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला जातो.
ऑनलाइन दंड झाल्यानंतर वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज येतो. हा दंड ऑनलाइन तसेच महामार्ग पोलिसांच्या कार्यालयात जाऊन भरण्याची सुविधा आहे.
९० टक्के वाहनचालक मात्र दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम