लस घेवूनही फायदा नाही ? अँटीबॉडीजचा नाश करतोय डेल्टा व्हेरिएंट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंट नाश करीत असल्याचे समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनात (आयसीएमार) असे आढळले की कोविशिल्ड लस घेणाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटची लागण होत आहे तर त्यापैकी काही जणांची अँटीबॉडी कमकुवत होत आहेत.

त्यामुळेच तज्ज्ञांनी लसीच्या तिसल्या डोसचा सल्ला दिला आहे. 614 जी म्यूटेशन असलेल्या जुन्या सार्स कोव्ह-2 च्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर तयार झालेली अँटीबॉडी 4.5 पट तर दुसऱ्या डोसनंतर तयार झालेली अँटीबॉडी 3.2 पटीने कमी करत असल्याचे आयसीएमआरच्या संशोधनात आढळले आहे.

ज्यांना कोविड झाला, त्यांच्यात कोरोना विषाणूने लसीच्या पहिल्या डोसप्रमाणे काम केले. अशा प्रकारे साथरोगातून बरे झाल्यानंतर दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांच्यात तीनवेळा अँटीबॉडीज तयार झाली.

जे व्यक्ती लस घेण्यापूर्वी अथवा नंतरही बाधित झाले नाही त्यांना कोविशिल्डचा तिसरा डोस देण्याची गरज आहे. आयसीएमआरने डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम शोधण्यासाठी ज्यांनी कोविशिल्डचे एक किंवा दोन्ही डोस घेतले त्या निरोगी लोकांचे नमुने गोळा केले.

जे कधीच संक्रमित झाले नाहीत परंतु कोविशिल्डचे एक वा दोन डोस घेतले त्यांच्या तुलनेत संक्रमणातून बरे झाल्यानंतर लस घेणारे आणि लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्यांमध्ये अधिक अँटीबॉडीज आढळल्या अशी माहिती व्हायरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!