अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- जिल्हयात मोठ्या प्रमाणात केंद्राकडुन निधी आणुन इतिहासात नोंद होईल असा उड्डाणपूल, हायवेची विकासकामे मार्गी लावली. आम्ही १०६ असुन विरोधात बसलो, परंतु कधी जाहीरात केली नाही.
महाविकास आघाडीचे नेते मी कीती साधा, समाजसेवक आणि खरा आहे हे दाखवत. उठता बसता सोशल मीडियावर जाहिरात करत जिल्हाभर फिरत असल्याची टिका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकास तर केला नाही, परंतु कोरोनासारख्या महामारीमध्ये समाजाला मदत करणाऱ्या आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यासारखे प्रकार घडले आहेत.
समाज हिताच्या कामांवर या लोकांनी आक्षेप घेतले आहेत. अशापध्दतीचे सध्या राज्यात काम सुरु असुन, जिल्हयातील काही नेते उठता बसता फोटो घेउन सोशलमीडियावर टाकत आहेत. आता फक्त आंघोळ करतांनाची टाकायची राहीली असल्याचे टिका यावेळी त्यांनी केली.
विकासची कामे आम्ही अनेक पिढयापासुन करत आहोत, कोरोनासारख्या महामारीमध्ये केंद्रसरकारने निधी कमी दिला.
त्यामुळे कामांना वेग देता आला नाही परंतु यापुढे जिल्हयातील सर्व कार्यालयामार्फत कुठल्याही मागणीवर ३० दिवसामध्ये कारवाई करुन लेखी स्वरुपात माहिती सबंधीतांना देण्याची व्यवस्था केलेली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी केली.
कोणी काही टिका केली तरी विकासकामे आणि जनतेची कामे ही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम