अरे देवा : देशावर संकटाची मालिका सुरूच …!  कोरोनानंतर आता आलाय ‘हा’ व्हायरस  

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  एकीकडे देशभरात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने काहिसे दिलासादायक चित्र असून  तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. तर दुसरीकडे अशा स्थितीतच आता ‘झिका’ या विषाणूचे आगमन झाले आहे.

केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवतीचा देखील समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

तिरुअनंतपुरममधल्या एका खासगी रुग्णालयात २८ जूनला एका २४ वर्षीय गर्भवती महिलेला दाखल केले होते. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचा त्रास होत होता.

ही सर्व लक्षणे झिका या आजाराची असल्याने पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती सध्या  स्थिर आहे. ही महिला राज्याबाहेर गेलेली नव्हती मात्र ती केरळच्या सीमावर्ती भागाची रहिवासी आहे.

या विषाणूची लक्षणे दिसायला ३ ते १४ दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणेदेखील दिसत नाहीत.

काही लोकांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची समस्या जाणवते. जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या नोंदीनुसार, झिका विषाणू एडीज डास चावल्यामुळे पसरतो. हे डास संध्याकाळी जास्त सक्रीय असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe