अहमदनगर ब्रेकिंग : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे.

चंद्रसेन तोडकर(वय-५१) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रसेन यांनी प्रवरानगर येथील आहेर वस्तीवरील शेतातील झाडाला गळफास लावून घेतला.

सकाळी ९.३० च्या सुमारास हि घटना घडली. चंद्रसेन यांनी आपल्या घरातील कपड्यांमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात चिट्ठी लिहून ठेवली होती.

त्यात कार्यालयाचे मॅनेजर आणि काही कर्मचारी आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe