देशावर तिसऱ्या लाटेच्या धोक्याची टांगती तलवार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी होत आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर बऱ्याच राज्यातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र अजूनही अशी अनेक जिल्हे आहेत जिथे कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नाही आहे.

बर्‍याच जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही चिंतेचा विषय बनली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बाजारपेठेत आणि इतरत्र वाढणारी गर्दी तसंच कोरोनाच्या नियमांचं पालन न करणे यावर चिंता व्यक्त केली आहे.

देशात जरी काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या राज्यातल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.

या दोन्ही राज्यांमध्ये दररोजची कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी असली तर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. दोन्ही राज्यात, गेल्या आठवड्यात देशात झालेल्या कोरोना व्हायरसपैकी 50 टक्के रुग्ण या दोन राज्यातून आली आहेत.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य अजूनही दुसऱ्या लाटेतल्या प्रकरणातून पहिल्या लाटेच्या स्थितीत पोहोचू शकला नाही आहे.

केरळमध्ये पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. राज्यात, 8 जुलै वगळता गेल्या महिन्यात कोरोनाची दोन वेळा नव्या रुग्णांचा आकजा 15 हजारांच्या वर गेला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News