आमदार नीलेश लंके म्हणाले माझ्या वाट्याला कायम …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- काेरोना संकटात ज्यांना जवळच्या माणसांना वाचवता आले नाही, ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार, असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी केला.

पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लंके बोलत होते. मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी मला कधीच स्वीकारले नाही.

माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. या पार्श्वभूमीवर माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांनीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला.

असेही आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात माजी आमदार विजय औटी यांनी आमदार लंके यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आपण आमदार असतो, तर काेरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंपैकी किमान ५० टक्के जीव वाचवले असते, असा दावा केला होता.

माजी आमदार औटी यांनी केलेल्या टिकेला आमदार लंके यांनी रविवारी प्रथमच उत्तर दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्यासह आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, उ

द्योजक मारुती रेपाळे, सरपंच नामदेव ठाणगे, किरण ठुबे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब ठाणगे, शारदा गांगड, सोनाली चौधरी, मंगल चौधरी, मनीषा ठाणगे, जितेंद्र उघडे, सुनीता औटी, सुनील ठाणगे, संदीप चौधरी, भाऊसाहेब पिंपरकर आदी उपस्थित होते‌.

आमदार लंके म्हणाले, काेरोना संकटकाळात जे सहा महिने लपून बसले होते, ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझा पींड काम करण्याचा आहे. मी कामातच राम मानणारा आहे. काेरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोविड उपचार केंद्रात तब्बल १७ हजार १०० रुग्ण काेरोनामुक्त झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe