रांची :- राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे.
झारखंडचे काँग्रेसचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी रविवारी येथे जाहीरनामा जारी करताना सांगितले की, जर राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, झामुमो आणि राजद आघाडीचे सरकार स्थापन झाले
तर प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल. सत्तेत येताच सहा महिन्यांच्या आत रिक्त सर्व सरकारी पदांवर भरती केली जाईल.