आज ३७८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५९० बाधितांची रुग्ण संख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ८५२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार १५० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९२ आणि अँटीजेन चाचणीत ३६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, नगर ग्रा. ०२, पारनेर १३, पाथर्डी ०१, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ११, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०९, जामखेड ०६, कर्जत ०९, कोपरगाव ०६, नगर ग्रा.१०, नेवासा ०८, पारनेर १५, पाथर्डी ०५, राहता ०४,

राहुरी ०५, संगमनेर ५७, शेवगाव २१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३६३ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, अकोले १५,

जामखेड १७, कर्जत ५३, कोपरगाव १३, नगर ग्रा. ३०, नेवासा ०८, पारनेर ८३, पाथर्डी १९, राहता ०५, राहुरी १४, संगमनेर ३१, शेवगाव १९, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा २५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले २२, जामखेड ३३, कर्जत ३१, कोपरगाव २२, नगर ग्रा. १३, नेवासा ०४, पारनेर ५२, पाथर्डी २०, राहता २७, राहुरी १७,

संगमनेर ४५, शेवगाव ०८, श्रीगोंदा ३८, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe