अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे शुक्रवारी बंदी असतांना देखील विना परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीत तब्बल १००० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करत कोरोनां नियमांनां नागरिकांनीं चक्क पायदळी तुडविले दरम्यान या शर्यतीची माहिती मिळताच पारनेर तालुक्यातील तहेसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी भेट देत संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीचे आयोजक अर्जुन लामखडे, गणेश लामखडे, हुंडा भोसले, दत्तात्रय चाटे, संतोष शिरल, संतोष गुंजाळ या ६ जणांवर ग्रामसेवक मीना जनार्दन काळे
यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ अधिनियम कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोविड नियमांच्या कायद्या अंतर्गत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम