अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यात नोकरीस असलेले जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजेंद्र बाळासाहेब देशमुख (वय ३९ वर्षे रा. कोतुळ, ता. अकोले) असे या जवानाचे नाव असून ते भारतीय सैन्य दलात भटिंडा, १११ रॉकेट रजिमेंट येथे हवालदार म्हणून सैन्यात सेवेत आहे. त्यांची बदली ईटानगर अरूणाचल प्रदेश एनसीसी बटालीयन ईटानगर येथे झाली.

दरम्यान, १५ दिवसांच्या रजेवर ते घरी आले होते. त्यानंतर (ता. २६ जून २०२१) रोजी ते कर्तव्यावर रूजू होण्यासाठी कोतुळ वरून नाशिक येथून रेल्वेने अरुणाचल प्रदेश ईटानगर या ठिकाणी कामावर रूजु होण्यासाठी गेले होते.
ते ( ता. २९ जून २०२१) रोजी ईटानगर येथे कामावर हजर झाले. त्यानंतर (ता. २९ व ३० जून २०२१) रोजी तेथेच कॉरंटाईन राहिले एक जुलै २०२१ रोजी रात्री १२.३० वाजता रेल्वेचे रिझर्व्हेशन करून ईटानगर ते गुवाहटी पर्यंत त्यांनी प्रवास केला.
त्यानंतर त्याच दिवशी एक जूलै २०२१ रोजी गुवाहाटी येथे आले. तेंव्हापासून त्यांचा संपर्क तुटला आहे. तो आजपर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही. हा सर्व प्रकार घातपात असल्याचा संशय पत्नी सुनीता राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम