अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- एका छोट्या स्तरावर झालेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, कोविड -19 लसचे अंश स्तनपानाच्या दुधामध्ये सापडले नाहीत.
हे असे दर्शवते की MRNA-आधारित लस स्तनपान देणारी महिला आणि त्यांच्या बाळांना सुरक्षित आहेत. फायझर आणि मॉडर्ना लस घेणार्या महिलांवर हा अभ्यास केला गेला.
लस घेतल्यानंतर दूध द्यावे का? ‘जेएएमए पीडीऐट्रिक्स’ या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात स्तनपान देणाऱ्य महिलांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले गेले आणि लस मिळाल्यानंतर स्तनपान रोखण्याच्या चिंतेकडे लक्ष वेधले.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन फ्रान्सिस्को (यूएससीएफ) च्या संशोधकांनी फाइझर आणि मॉडर्नाकडून एमआरएनए-आधारित लस घेतल्यानंतर सात महिलांच्या दुधाचे विश्लेषण केले आणि त्यांना लस डोसचा कोणताही अंश त्यात सापडला नाही.
डब्ल्यूएचओने हा सल्ला दिला – संशोधकांनी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्तनपान देणाऱ्या महिलांना लसी देण्याची शिफारस केली आहे. ‘अॅकेडमी ऑफ ब्रेस्टफिडिंग मेडिसिन’ च्या मते, स्तनपानाच्या दुधात लस जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
यूसीएसएफच्या सहाय्यक प्राध्यापकांनी सांगितले की, “एमआरएनए-आधारित लस स्तनपान करणारी महिला आणि त्यांच्या बाळांना सुरक्षित आहेत आणि स्त्रियांनी त्यांच्या मुलांना स्तनपान देण्याचे थांबवू नये .” हा स्टडी डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम