निवडणुकानंतर पेट्रोलच्या दरात 11 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रतिलिटर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 89.87 रुपयांवर स्थिर राहिला.

सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दैनिक आधारावर 6 नंतर दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर सुधारित करून जारी करतात.

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा,

तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

जाणून घ्या महानगरांतील आजचे लेटेस्ट रेट – आता दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे. – कोलकातामध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 102.08 रुपये आहे.

तर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 93.02 रुपये आहे. – आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.

असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन – डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe