अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह सात जणांना पोलीस कोठडी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांनी अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून पालिकेत गुरुवारी झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन नगरसेवकांसह सात आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोपरगाव शहरातील बस स्थानाकासमोर आलेल्या पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या दोन टपर्‍या प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या आदेशानुसार काढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ हे गेले असता त्यांना या शिवसैनिकांनी दमदाटी केली.

त्यानंतर अतिक्रमण करणारा बालाजी गोर्डे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांच्यासह अनेक सेना कार्यकर्ते घेऊन पालिका कार्यालयात गेला असता बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची व काचांची तोडफोड करून नुकसान केले.

तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांना गलिच्छ शिवीगाळ व मारहाण करून मोठमोठ्याने आरडाओरड केली .

याप्रकरणी शहर पोलिसांत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना माजी शहर प्रमुख सनी रमेश वाघ, नगरसेवक योगेश तुळशीदास बागुल, उपजिल्हाप्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव,

बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, निलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी वरील सातही आरोपींना कोपरगाव येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजार केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe