टोल मागणाऱ्यास वाहनचालकाने पिस्तूल दाखवले अन…!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- टोल वसुलीवरून एका वाहनचालकाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला चक्क पिस्तूल दाखवून दमबाजी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वाहनचालक नाशिक-पुणे महामार्गावरून जात होता. हिवरगाव पावसा येथील टोलनक्याजवळ हे वाहन थांबले असता वाहन चालकाची गोकुळ नेहे या कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली.

गाडीची टोलपावती फाडु नका माझ्याकडे फास्ट टॅग आहे, असे वाहनचालकाने सांगितले असता टोल नाक्यावरील कर्मचारी नेहे हा वाहनाचा नंबर सर्च करत होता. यामुळे संतापलेला वाहनचालक शिवीगाळ करत गाडीच्या खाली उतरला.

त्याने गाडीच्या डॅशबोर्डमधून पिस्तूल काढून या कर्मचाऱ्याला धमकी दिली. याबाबत गोकूळ सोपान नेहे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी इन्होवा (कार नं. एमएच १२ जे झेड २९५५) या वाहनावरील चालक कोते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलच्या ॲपवर त्याचे नाव कोते असे आले. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News