अहमदनगर सावधान : चांदबीबी महालावर जाण्याआधी ही बातमी वाचाच…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे चांदबीबी महाल परिसरात पुन्हा एकदा बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वन विभागाने नेमक्या कोणत्या भागात बिबट्या आहे, याचा शोध सोमवारी सुरू केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य असून, पावसामुळे आता गवत आणि झुडपांमध्ये वाढ झाल्यामुळे या भागात फिरायला

येणार्‍यांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चांदबीबी महाल परिसरात यापूर्वी दोन-तीनवेळा बिबट्याचे दर्शन झालेले आहे. या भागात पहाटेपासून सकाळी उशीरापर्यंत आणि सायंकाळीही उशीरापर्यंत फिरायला येणार्‍यांची संख्या मोठी आहे.

हा भाग बराचसा वन विभागाचा असल्याने येथे गर्दी करण्यास तशी मनाई आहे. मात्र नागरिकांना फिरण्यासाठी मोकळी जागा नसल्याने येथे विरोध केला जात नाही. मागे एकदा भल्या सकाळी तर एकदा सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते.

चांदबीबी महाल परिसरातही बिबट्या दिसल्याने हा परिसर काही दिवसांसाठी लोकांना येण्यास बंद केला होता. मात्र कालांतराने तो पुन्हा खुला करण्यात आला. रविवारी सायंकाळी काही तरूण महालावर गेले असताना वाहनाच्या उजेडात त्यांना समोर बिबट्या दिसला.

बराचवेळ तरूणांना त्याचे दर्शन झाले. त्याची व्हिडिओ क्लिप रात्रीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. सकाळी या भागात फिरायला जाणारेही यामुळे सावध झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe