अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे बंद असलेला ऑक्सीजन प्लांट चालू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन प्लांट बसवण्यात आला होता मात्र हा प्लान्ट गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याच्या

निषेधार्थ विश्व मानव अधिकार परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन चर्चा करताना जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक अल्ताफ शेख,

जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, युवक जिल्हाध्यक्ष शहजाद खान, शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, शरीफ सय्यद आदी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे

मागील काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहरात ऑक्सिजनची कमतरता झाली होती मात्र आपल्या सतर्कतेमुळे पाहिजे तेवढे ऑक्सिजन उपलब्ध झाले होते मात्र तिसरी लाटेची शक्यता बघता जिल्हा रुग्णालयातील हा ऑक्सीजन प्लांट लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे जेणेकरून भविष्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली

तरी ही ऑक्सिजन अभावी रुग्णाच्या जीवितास धोका होणार नाही कोरोणा आटोक्यात यावा यासाठी देखील आपण प्रयत्न केले आणि करत आहात मात्र सध्यातरी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे तसेच दररोजची कोरोना रुग्णांची संख्या बघता येणाऱ्या काही दिवसात ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे

त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटची लवकरात लवकर दुरुस्ती करावी सध्या बंद असलेल्या ऑक्सीजन प्लांट च्या माध्यमातून दररोज 60 ते 70 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होत होता त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना याचा लाभ मिळत होता

तसेच जिल्हा रुग्णालयातहे जिल्ह्यातील सर्वात मोठा रुग्णालय असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे हा बंद असलेला प्लांट लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe