धक्कादायक! ‘तू’ कोणाच्या जीवावर उड्या मारतोस??  पत्रकारास रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे धमकी

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. मात्र अलीकडे जिल्ह्याची ही ओळख पुसते की काय अशी शंका येते आहे. कारण साध्य जिल्ह्यात रोज चोरी, लूटमार, खून आशा घटना घडत आहेत.

पारनेर तालुक्यात तर चक्क एका पत्रकारास तू कुणाच्या… आमदार निलेश लंके आणि राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतोस ना. असे म्हणत धारदार शस्त्र व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील पारनेर येथील पत्रकार वाघमारे यांना मोबाईलवरून फोन करून तू आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय.

असे म्हणत शिवीगाळ केली तसेच भरचौकात रिव्हॉल्व्हर व तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना ही सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध केला.

वाघमारे हे पारनेर येथे आंबेडकर चौकात असताना प्रकाश पवार याने तू आमच्या विरोधात बातम्या छापतोस तु त्या आमदार निलेश लंके आणि राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतोस ना,

असे म्हणून धारदार तलवार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी प्रकाश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe