अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ह्या दोन तालुक्यात पुनःश लॉकडाऊन !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर व संगमनेर तालुक्यात वाढत आहेत.

कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी करोनाचे १ हजार २२४ नवे रुग्ण आढळून आले. आज किंचित घट होऊन ९२० रुग्ण नोंदले गेले. उपचाराधीन रुग्णांची संख्या आता साडेपाच हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. पारनेर, संगमनेर, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यांत रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.

त्यापैकी पारनेर आणि संगमनेर हे हॉटस्पॉट ठरले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा बैठक घेऊन तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना कालच दिल्या आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा निर्बंध कडक केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यात दुसऱ्या लाटेपासून रुग्णसंख्या जास्त असून ती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे मधल्या काळात काही उपायही करण्यात आले. त्याचा फारसा फरक पडलेला नाही.

आता या तालुक्यात करोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या ४३ गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात फक्त औषध दुकाने आणि दवाखाने सोडता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe