अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रकियेस सुरुवात झाली आहे. या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी साधारणता 200 विनंती बदल्या केलेल्या आहेत असे सांगितले. नगर जिल्हा पोलीस दलामध्ये जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
यामध्ये विनंती बदल्यांबरोबरच प्रशासकीय बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली आहे. त्याचा प्रामुख्याने विचार आला सुरू झालेला आहे.
दोन दिवस ही बदली प्रक्रिया सुरू राहणार जिल्ह्यातील 14 तालुक्यातील जे कुणी विनंती बदल्या संदर्भातले कर्मचारी आहेत. त्यांना सुरुवातीला प्राधान्य देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना विनंती बदल्या कुठे पाहिजेत, याची विचारणा केली.
त्यानंतर प्रशासकीय बदल्यांना सुरुवात झाली. दोन दिवस ही बदली प्रक्रिया सुरू राहणार आहे. या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की प्रशासकीय अडीचशे जणांनी बदल्या केल्या तर विनंती बदलीसाठी 200 अर्ज सादर झाले. त्या बदल्या मध्ये 250 बदल्या करण्यात आलेले आहे. आमच्याकडे साधारणतः 400 अर्ज आले होते असेही त्यांनी सांगितले,
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम