अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-देशामध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. आता पुन्हा चिंता वाढू लागली आहे.
अलीकडच्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंता वाढीस लागली आहे. कोरोनाबाबत नेहमीच नवनवीन संशोधने पुढे आले आहेत. आता एका नवीन अभ्यासानुसार कोरोना संसर्गात डोळे देखील संक्रमित होऊ शकतात असे समोर आले आहे.
रेटिनामध्ये विविध बदल आढळून आले आहेत. व्हायरल कण डोळयातील रेटिनाच्या विविध स्तरांमध्ये प्रवेश करू शकतात. एकदा श्वसन प्रणालीतून संसर्ग सुरू झाल्यानंतर कोरोना विषाणू संपूर्ण शरीरात पसरू शकतो. हे शरीराच्या विविध अवयवांमध्ये आणि ऊतींमध्ये प्रवेश करू शकते.
ब्राझीलच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कोरोना विषाणूंनी संक्रमित झालेल्या लोकांच्या डोळ्यात हा विषाणू रेटिनापर्यंत पोहोचू शकतो. कोरोना व्हायरस (कोविड -19) चे संक्रमण असलेल्या लोकांच्या शरीरात या धोकादायक विषाणूच्या प्रसारासंदर्भात एक नवीन अभ्यास करण्यात आला आहे.
जेएएमए नेटवर्क पत्रिका मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोरोनामुळे जीव गमावलेल्या तीन रुग्णांच्या संशोधनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या सर्व रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे वय 69 ते 78 वर्षे आहे. रेटिनामध्ये कोरोनाची उपस्थिती शोधण्यासाठी संशोधकांनी पीसीआर चाचण्या आणि इम्यूनोलाजिकल पद्धती वापरल्या.
रेटिनाच्या बाह्य आणि आतील थरांमध्ये कोरोना प्रथिनांची उपस्थिती इम्युनोफ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपीद्वारे रुग्णांमध्ये दिसून आली. ब्राझीलच्या रिसर्च इन्स्टिट्यूट INBEB चे संशोधक कार्ला ए.आरोजो-सिल्वा म्हणाले, “कोरोना संसर्गाशी संबंधित असामान्यता डोळ्यांमध्ये पाहायला मिळाल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम