अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-द्राक्ष हे फळ सर्वत्र आणि उन्हाळ्यात उपलब्ध होणारे फळ आहे. द्राक्षांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ना सोलायचा त्रास ना बिया काढायचा. धुवून घेतले की पटापट खाऊ शकतो. द्राक्षांचा रंग कोणताही असला तरी त्यामुळे आरोग्यास खूप फायदा मिळतो. चवीला आंबट गोड असणारे द्राक्षे आरोग्यास खूप फायदेशीर आहेत.
जाणून घेऊयात द्राक्षाचे फायदे :-
१) -द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.
२) कॅन्सरला विरोध :- उन्हाळ्यात जर तुम्ही द्राक्ष खाल्लीत तर तुमचा कॅन्सर पासून बचाव होऊ शकतो. द्राक्षात अनेक प्रकारचे घटक आढळतात जे कॅन्सर विरोधी गुणधर्म म्हणून काम करतात. याच घटकांमुळे तज्ञ देखील उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचा सल्ला देतात.
३) रक्तदाब कमी होतो :- या धावपळीच्या युगात प्रत्येक जण ताण तणावाखाली वावरतो आहे आणि या तणावातूनच हृदयाशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात.
या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर द्राक्ष तुमची मोठी मदत करू शकतात. द्राक्षांमध्ये पोटेशियम पुरेशा प्रमाणात आढळते, जे रक्तदाब कमी करण्याचे आणि सामान्य ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मंडळी तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून द्राक्ष खाल्ली पाहिजेत.
४) शुगरचा त्रास असणाऱ्यांना फायदेशीर :- मधुमेहापासून सुरक्षित राहण्यासाठी देखील द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. द्राक्ष खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचा स्तर खूप कमी होतो. या सोबतच हे फळ शरीरातील रक्ताच्या साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचेही काम करते.
तुमच्या रक्तात जितकी साखर असेल तेवढा तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मधुमेहापासून स्वत:च्या शरीराचा बचाव करायचा असेल तर तुम्ही द्राक्ष खायला हवीत. एका वैज्ञानिक संशोधनानुसार सुद्धा या गोष्टीची पुष्टी करण्यात आली आहे.
५) सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने आर्थराइटिस किंवा सांधेदुखीवर आराम मिळतो.
६) भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम