विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही – आमदार काळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ते पाथरे जिल्हा हद्द रस्ता खडीकरण करणे कामाचे व मढी बुद्रूक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील सीडी वर्क करणे व मढी बुद्रूक ते कोळगाव रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, संभाजीराव काळे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रवींद्र काळे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,

भास्करराव काळे, मच्छिंद्र जाधव, प्रकाश काळे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, देर्डेचे सरपंच योगिराज देशमुख, मढी बुद्रूकचे सरपंच प्रवीण निंबाळकर,

उपसरपंच रेखा गवळी, मढी खुर्दचे सरपंच सुनील भागवत, नरहरी रोहमारे, श्रीधर आभाळे, सोपानराव गवळी, भाऊसाहेब कुऱ्हाडे, उत्तमराव कुऱ्हाडे, बिपीन गवळी, अशोक गवळी, प्रमोद आभाळे, रवींद्र आभाळे, आबासाहेब आभाळे, भरत आभाळे, आण्णासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe