शिर्डी साईबाबा सुपरस्पेशलिटी कोविड सेंटर हलवा – स्नेहलता कोल्हे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गावर उपचारासाठी श्रीसाईबाबांच्या शिर्डीत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू केले. पण तातडीने करावयच्या शस्त्रक्रिया थांबल्या असून रुग्णांचे हाल सुरू आहेत.

त्यामुळे हे कोविड सेंटर साईनाथ हॉस्पिटलमध्ये हलवून श्रीसाईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रियेसह अन्य तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनगर जिल्हाधिकारी व साईबाबा संस्थान यांच्याकडे एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली.

कोल्हे म्हणाल्या, गोरगरीब रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया उपचार सुविधेसाठी श्री साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहे.

सध्या कोविड सेंटरही याच इमारतीत सुरू आहे. येथील छोट्या, मोठ्या, गंभीर आजाराच्या व तातडीच्या उपचारांवर मोठा परिणाम झाल्याचे म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News