अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या विषाणूसोबत जगायला शिका. आपल्याला कोरोना विषाणूसोबत राहण्याची तयारी ठेवावी लागेल. कोरोनाचे अनेक व्हेरिएंट येत राहतील आणि ते जगभरात पसरतील, असा गंभीर इशारा चीनमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ शी जेंगली यांनी दिला आहे.
जेंगली यांना चीनमध्ये बॅट वूमन म्हणून ओळखले जाते. शी जेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या उपसंचालक आहेत. याच प्रयोगशाळेतून करोनाचा विषाणू बाहेर पडला असल्याचा आरोप अमेरिकेसह इतर देशांनी केला आहे. लोकांना कोरोना विषाणूसोबत जगणे शिकावे लागेल.
या विषाणूचे विविध व्हेरिएंट येत राहतील. ते जगभर पसरत राहतील. आपल्याला आता घाबरता कामा नये. कोरोनासह दीर्घकाळ राहण्याची तयारी करावी लागणार आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने विषाणू म्युटेट झाला.
जगामध्ये कोरोना विषाणूचे आणखी व्हेरिएंट समोर येतच राहतील. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे असे शी जेंगली म्हणाल्या.
चिनी व्हायरोलॉजिस्ट जेंगली यांना 2020 मध्ये चिनी माध्यमांनी बॅट वूमन असे संबोधण्यास सुरुवात केली. त्यांना टाईम मासिकाच्या जगातील 100 प्रभावी व्यक्तिंच्या यादीत स्थान मिळाले होते.
जेंगली यांच्यामुळे चीनला करोनाच्या पहिल्या लाटेवर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे म्हटले जाते. जेंगली या वटवाघळांवर संशोधन करत आहेत.
वटवाघळांमधून येणाऱ्या विषाणूंबाबत अभ्यास सुरू आहे. येत्या काही वर्षात करोनापेक्षाही अधिक घातक विषाणूंचा संसर्ग फैलावण्याचा इशारा त्यांनी मागील वर्षी दिला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम