अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पाण्याबद्दलची महत्वाची बातमी…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरातील विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे अमृत अभियान अंतर्गत नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे सुरु असलेल्या कामामुळे काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेमार्फर्त करण्यात आले आहे.केंद्रशासित अमृत अभियान योजनेचे काम प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथून उपलब्ध होणार्‍या पाण्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिये शिवाय काही प्रमाणात मिसळले जात आहे.

त्यादृष्टीने विळद जलशुद्धीकरण प्रकल्प व वसंत टेकडी जलकुंठ येथे तुरटी व क्लोरीनची मात्रा वाढवण्यात आलेली आहे.या कामामुळे नागरिकांना काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजाराची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe