अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सोमवारी नगरच्या बाजार समितीत 500 ते 600 डाग मूगाची आवक झाली असून एकनंबर मूगाला प्रती क्विंटल 7 हजार 150 रुपये भाव मिळाला आहे. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग पिकाची आवक सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानूसार या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत भूसार मालाचे लिलाव होणार आहेत.
पहिल्या दिवशी शेतकर्यांच्या मूगाची आवक सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 500 ते 600 डाग आलेले होते. त्यात मूगाला जास्तीत-जास्त 7 हजार 150 रुपये प्रति क्विंट्ल दर मिळाला.
आता या ठिकाणी दररोज सकाळी भूसार मालाचे लिलाव सकाळी 11 वाजता सुरु होणार आहेत. यामुळे मुग उत्पादक शेतकर्यांनी विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करुन आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले.
तसेच नगरच्या बाजार समितीकडून जिल्ह्यातील मुग उत्पादक शेतकर्यांना बाजार समितीचे मुख्य यार्डच्या भूसार माल विभागात मूग विक्रीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिलावा दरम्यान उपसभापती संतोष म्हस्के, सचिव अभय भिसे, सह सचिव सचिन सातपुते, विभागप्रमुख कराळे हे उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम