विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 11 वी प्रवेशासाठी 16 ऑगस्टपासून अर्ज करता येणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात आला यानंतर 11 वीच्या प्रवेशाची प्रकिया ही 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेपूर्वी सीईटी घेतली जाणार आहे.

दरम्यान अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करून विद्यार्थी अर्जाचा भाग-1 भरू शकतात.

मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर आदी महानगरपालिकांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरू शकतात.

शिक्षण संचालनालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची कार्यवाही मागील महिन्याच्या अखेरीस सुरू केली आहे. केवळ नोंदणी आणि प्राथमिक माहिती भरण्यासाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्यात आता विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून आपला अर्ज आणि त्यातील भाग-1 हा पूर्ण भरता येणार आहे. त्यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा शिक्षण विभागाकडून दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

जे विद्यार्थी 16 ऑगस्टपासून आपले ऑनलाइन अर्ज भरतील ते अर्ज आणि त्यातील माहिती तपासून घेण्याची जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांवर सोपविण्यात आलेली आहे.

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी निकष काय?

१) CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

२) CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

३) त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश ४)CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता १० वीच्या पद्धतीनुसार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe