अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- सावेडीतील सॅमसंग केअरमध्ये वीज मीटरच्या टर्मिनलवर छिद्र पाडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने हि कारवाई केली आहे.
यावरकरण तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा मनोज मोदी, रवींद्र कुंभार (दोघे रा. झोपडी कॅन्टीनजवळ, सावेडी) व एक अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/08/01_02_2019-electricystealinfg_18909195.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी कि, महावितरणचे भरारी पथकाने झोपडी कॅन्टींगजवळील हिमालय टावर येथील सॅमसंग केअरमध्ये जाऊन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी पथकाच्या असे लक्षात आले की, वीज मीटरच्या टर्मिनलवर छिद्र पाडून एकूण दोन लाख 94 हजार 390 रुपये किमतीचे 10 हजार 975 युनिटची वीज चोरी केली आहे.
पथकाने सदर वीज मीटरचा पंचनामा करून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात विद्युत कायदा कलम 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार गिरीष केदार करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम