विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क कपातीवरून मनसे आक्रमक; 50 टक्के फी कपातची केली मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  शासनाने 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय ही घेतला. मात्र, 15 टक्के फी कपात जनतेची घोर फसवणूक असून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

मनसेच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची 15 टक्के शैक्षणिक फी कपात करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. मात्र शासनाने 50 टक्के फी कपात करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी मनसेच्यावतीनेकरण्यात आलेली आहे.

दरम्यान गेल्या दीड वर्षपासूनच्या करोना काळात सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. काही शाळा, कॉलेजेस वगळता इतर खासगी संस्था शाळेच्या विद्यार्थांकडून विनाकारण अवाजवी फी वसूल करत आहेत.

फी न भरल्यास निकाल राखून ठेवणे व वारंवार पालकांकडे तगादा लावणे असे प्रकार शाळांकडून होत आहेत. या संदर्भात पालकांनी मनसेकडे धाव घेऊन आपल्या समस्य मांडल्या. त्यानुसार मनसेच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदने देऊन फी कपात विषयी पाठपुरावा करण्यात आला.

राज्य सरकारने 15 ऐवजी 50 टक्के फी कपातीचा निर्णय घ्यावा, अन्यथा पालकांसह आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.