अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरानजीकच असलेल्या प्राध्यापकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास पाच दिवस उलटूनही लागू शकला नाही. याबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
केवळ तपास चालू आहे या नावाखाली पोलीस नागरिकांची दिशाभूल करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या ऐनतपूर शिवारातील श्रीरामपूर शहरालगत बोंबले वस्ती येथे शिक्षक कॉलनीतील घरी चोरट्यांनी दरोडा टाकुन घरातील सोने,
रोख रक्कम अन्य वस्तु मिळुन सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटुन नेला. या घटनेस आज पाच दिवस उलटूनही पोलीस तपासात प्रगती करु शकले नाहीत. या अगोदरही निपाणीवडगाव येथील माजी उपसरपंचाच्या घरावर दरोडा पडला होता.
त्याचाही तपास लागू शकला नाही. तसेच एसटी स्टँड शेजारीच असलेलले मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाखाहून अधिक ऐवज चोरुन नेला होता.
मात्र यातील दोन घटनांना एक महिन्याच्या आसपास कालावधी लोटलेला असतानाही त्याचाही तपास करता आला नाही. साधे धागेदोरेही मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम