अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- कित्येकदा पदार्थांची चव बिघडते. जेव्हा स्वयंपाक करताना छोट्या छोट्या चुका होतात तेव्हा असे होते. या चुका कोठे होतात ते पाह्या.
मिठाचा अंदाज :- पदार्थांमध्ये मीठ नेहमी कमी टाकावे. आपल्याला वाटत असेल की, भाजीत मीठाचे प्रमाण एक चमचा असायला हवे, तेव्हा अर्धा चमचाच मीठ टाका. जेव्हा शेवटी मीठ कमी वाटेल तेव्हा ते चवीनुसार टाकू शकता. कारण मीठ कमी असल्यास ते संतुलित करता येते, पण जास्त झाल्यास कमी करता येत नाही.
जिरे-मोहरीची फोडणी :- जेव्हा मोहरी ब जिरे व्यवस्थित तडकवले जात नाही, तेव्हा ते कच्चे राहते. मोहरी व जिरे नेहमी तीव्र जाळावर व अत्यंत गरम तेलात टाकून तडकवावे. जेव्हा मोहरी तडतडण्याचा आवाज बंद होईल तेव्हा त्यात कांदा मसाला टाका. मोहरी व जिरे कच्चे राहिल्यास खाण्याची चव खराब होईल.
मसाला कच्चा राहणे : जेव्हा भाजीचा मसाला कच्चा राहतो तेव्हा भाजी बेचव होते. कोणत्याही भाजीचा मसाला गरम तेलात टाकून थोडासा परतणे पुरेसे नसते. मसाले तोपर्यंत भाजा जोपर्यंत तो कढईचा तळ व तेल सोडणार नाहीत. विशेषत: कांदा व टोमॅटोचा कच्चेपणा दूर होणे आवश्यक असते.
करपलेल्या ब कडक चपात्या :- चपाती भाजल्यानंतर ती पांढरी होत नसेल व काळी होत असेल, तर आपण ती लाटताना चूक करीत असता. चपाती लाटताना जर पिठी जास्त वापरली, तर चपाती वा रोटी काळी व कडक होते. कमी पिठीत चपाती लाटा व नंतर एका हातावरून दुसऱ्या हातावर पालथी करून पिठी झाडून त्यानंतर तव्यावर भाजा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम