अशी वेळ कोणावरही येऊ नये ! बाळाला जीवदान आणि आई कायमची…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- रात पाहुणा येणार असल्याने नवचैतन्य निर्माण झाले होते. प्रत्येक दिवस आनंदात जात होता. या आनंदात आठ महिने लोटल्यानंतर घरात धार्मिक विधीचा निर्णय झाला अन् दुःखाचा डोंगर कोसळला.

बाळाला जीवदान देऊन ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. विधीतील कार्यक्रमावरून पती-पत्नींमधील किरकोळ वाद विकोपाला गेला.

दारूच्या नशेत पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन ती कोमात गेली. रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले. ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला.

सुनील व वर्षा या दोघांमध्ये मंगळवारी (ता. 27) सकाळीच वाद झाले. त्यानंतर सुनील सकाळी सात वाजता गावठी अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेला.

दारूच्या नशेत त्याने वर्षा हिला लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. डोक्‍याला दांडके जोरात मारल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याची नशा उतरली.

टोल फ्री क्रमांक असलेल्या 108 या क्रमांकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवून घेतली. वर्षा हिला उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले.

त्यावेळेस सुनील याने रस्ता अपघातात डोक्‍याला मार लागल्याचे सांगितले. डॉक्‍टरांनी पाच-सहा तास उपचार केले.वर्षाचे आई झाली परंतु, तिची प्राणज्योत मालवली.

ही घटना नगर तालुक्यातील विळद पिंप्री शिवारात 27 जुलै रोजी घडली. पतीने वर्षा अपघातात जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा डाव रचला होता.

परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षाचा खून झाला असल्याची बाब समोर आली. एमआयडीसी पोलिसांनी सुनीलला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe