अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्येत पुणे आघाडीवर; जाणून घ्या इतर जिल्ह्यांची परिस्थिती गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन देखील करण्यात आला.
आतापर्यंत देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुणेकरांची चिंता अजूनही कायम आहे. कारण, सक्रिय रुग्णांचा बाबतीत पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
तर, मुंबईतील स्थिती मात्र काही प्रमाणात दिलासादायक आहेत. पुण्यात सध्या कोरोनाचे 13715 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईत 2880 सक्रिय रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पुणे, ठाणे, अहमदनगर, सातारा आणि सांगली हे जिल्हे टॉप ५ मध्ये आहेत. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 350 ते 400 रुग्णांची भर पडत आहे.
तर, संपूर्ण राज्यभरातून दररोज 3500 ते 4000 नवे रुग्ण समोर येत आहेत. राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे.सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 51 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण –
पुणे जिल्हा-13715
ठाणे जिल्हा- 7082
अहमदनगर–5295
सातारा-5254
सांगली–4876
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम