या सरकारने निधी तर दिला नाही मात्र मंजूर निधी मागे घेतला..! भाजपच्या ‘या’ आमदाराचा घणाघात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून विकासकामांना निधी मिळत नाही. मात्र भाजपच्या काळात विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी मागे नेण्याचे पाप या आघाडी सरकारने केले आहे.

असा घणाघाती आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. शेवगाव येथील एका विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात सत्ता असतांना मतदार संघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले, मात्र आघाडी सरकार विकास कामांना निधी देतांना भेदभाव करत आहे.

निधी देणे तर दुरच परंतु भाजपच्या काळात विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी मागे नेण्याचे पाप या आघाडी सरकार करत असल्याची घणाघाती टिका त्यांनी केली.

तसेच भाजप शासनाच्या काळात लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत मंजूर करण्यात आलेले एरंडगाव भागवत व एरंडगाव समसूद येथील सभामंडपाची कामे आघाडी सरकारने पैसे न दिल्याने होऊ शकली नाहीत.

त्यामुळे सदर कामे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पूर्ण करणार असून म तदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News