अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखवून झारखंड येथील एकास श्रीगोंदा तालुक्यातील विसा पूर गावाच्या शिवारात १०ते १५ जणांच्या टोळीने मारहाण करून लुटले व सर्वजण पळून गेले.
मात्र याबाबत ची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच यातील सातजण जेरबंद केले असून, त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२७ ऑगस्ट रोजी सुरजकुमार कारू साव (वय २४ वर्षे धंदा पोकलंड ड्राव्हर मुळ रा.बुखारी थरमण ता.जि.बुखारो राज्य झारखंड ह.रा. पारगाव सुद्रिक ता. श्रीगोंदा) याला राजु नामक इसमाने फोन करून बोलावुन ‘ तुला स्वस्तात सोने देतो.
असे सांगत विसापूर रेल्वे पुलाजवळ बोलावून घेत त्यांच्याकडून सोने नेण्यासाठी आणलेली रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, विसापूर शिवारात रेल्वे पुलाचे पुढे विसापूर ते उख्खलगात जाणारे रोडचे बाजुला एक ओनळखी महिला व त्याचे बरोबर इतर १५ ते २० साथीदारांनी दगडाने व काठीने मारहाण करून पळवून नेला.
या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच अश्या प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी व रेकॉर्ड वरील आरोपीचा फोटो फिर्यादीस दाखवुन पोलिसांनी आरोपीचा उखलगाव शिवारात शोध घेतला असता,
शभ्या कुंज्या चव्हाण (वय २८ वर्ष रा.सुरेगाव), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५ रा.पढेगाव ता.श्रीरामपुर), बाबुश्या चिंगळया काळे (वय १८ वर्ष रा.वांगदरी ता.श्रीगोंदा), घड्याळ्या हिरामण चव्हाण (वय ५० वर्ष रा.सुरेगाव), सौ.रेबीन घड्याळ्या चव्हाण (वय ४५ वर्ष रा.सुरेगाव),
ओंकार कुज्या चव्हाण (वय १९ वर्ष रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा), शुभम चिंगळया काळे (वय १७ वर्ष रा.वांगदरी ता.श्रीगोंदा) या सात जणांना अवघ्या दोन तासात ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या मुददेमाला पैकी १० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम