सप्टेंबरमध्ये लॉन्च होतायेत ‘ह्या’ 5 जबरदस्त कार ; स्टाईलसोबतच मिळतील शानदार फीचर्स देखील

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाची स्थिती गेल्या एक वर्षापासून वाईट होती पण पुन्हा एकदा हा उद्योग पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या शक्तिशाली कार लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष असणार आहे कारण अनेक कार कंपन्यांनी एक से बढ़कर एक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या कार लॉन्च होणार आहेत ते जाणून घेऊयात –

 फॉक्सवैगन Taigun 23 सप्टेंबर रोजी भारतात फोक्सवॅगन टायगुन लॉन्च होईल. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीकडून भारतीय कार बाजारात बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जात आहेत. फॉक्सवैगन Taigun SUV भारतीय परिस्थितीनुसार तयार करण्यात आली आहे. फॉक्सवैगन Taigun दोन पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये सादर केली जाईल.

 ह्युंदाई आय 20 एन लाइन-  ह्युंदाई आय 20 एन लाईन आधीच प्रदर्शित केली गेली आहे आणि आता ती अधिकृतपणे 2 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाईल. I20 N लाईन लोकप्रिय कोरियन हॅचबॅकचे एक स्पोर्टीयर व्हेरिएंट आहे आणि कारला अनेक अपडेट फीचर देखील मिळतात जी ग्राहकांना आवडतील.

MG Astor- एमजी एस्टर, जे प्रत्यक्षात ZS EV ची पेट्रोल वर्जन आहे. हे अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स सह सुसज्ज आहे. त्यात लेव्हल 2 ऑटोनॉमस टेक्नोलॉजी आणि ADAS (प्रगत चालक सहाय्यक प्रणाली) देखील समाविष्ट आहे. आय-स्मार्ट हबद्वारे संचालित वैयक्तिकृत AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सपोर्ट प्रदान करणारे हे ऑटोमोबाईल उद्योगातील पहिले वाहन असेल.

KIA सेल्टॉस X-Line – केआयए सेल्टोस ही कंपनीची पहिली अशी कार आहे, जी भारतीय बाजारात यशस्वी झाली आहे. कोरियन कंपनी आता सेल्टोसचे एक्स-लाइन व्हेरिएंट भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही SUV वर्ष 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. सध्या केआयए कंपनीने या एसयूव्हीच्या लॉन्चिंग ची जाहीर केलेली नाही, परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी- ऑडी इंडियाने अलीकडेच आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार ‘ई-ट्रॉन जीटी’ चा एक छोटा टीझर व्हिडिओ जारी केला. ही कार लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे, जी काही आठवड्यांत भारतीय बाजारात दाखल होईल. मिळालेल्या माहितीनुसार, ई-ट्रॉन जीटी मध्ये एका चार्जवर 487 किमीची पूर्ण चार्जिंग ड्रायव्हिंग रेंज आहे. दुसरीकडे, आरएस ट्रिम 471 किमीच्या पूर्ण चार्ज श्रेणीसह येते. वेगाच्या बाबतीत, ऑडी ई-ट्रॉन केवळ 4.1 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News