अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे.
भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत.
पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये ‘अयोग्य’ ठरवण्यात आला आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘पॅनल भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारला पॅरालिम्पिकमध्ये त्याच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या F52 थाळीफेक स्पर्धेत अयोग्य मानण्यात आले आहे.
त्यामुळे त्याने जिंकलेले पदकही अयोग्य म्हणून करार दिले जात आहे.’ विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे तिसरं स्थान मिळवलं होतं.
पण इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला संबधित श्रेणीत समाविष्ट करण्यावर काही प्रश्न उचलले. ज्यामुळे त्याचं पदक होल्डवर ठेवण्यात आले होते.
ज्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पदक वितरणादरम्यान हे पदक बाद म्हणून घोषित करण्यात आलं. विनोद कुमार असलेल्या F52 स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्या मांसपेशींमध्ये कमजोर असते.
त्यांना अधिक हालचाली करता येत नाही. तसंच काहींच्या हातात, पायातही विकार असतो. तसंच ज्याच्या मणक्यात त्रास असतो, त्याचा एखादा शरीराचा भाग तुटलेला असतो असे खेळाडूही यामध्ये सहभाग घेतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम